Tuesday, 20 February 2018

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी 28 फेब्रुवारी पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करावेत



        जळगाव, दि. 20 - शिक्षण संचलनालय, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून सन 2017-18 वर्षासाठी देय पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती सह इतर शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य व सवलती योजनांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
 ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी  Maha DBT Portal व्दारे ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनीही संबंधित महाविद्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी, 2018 पर्यंत आहे.
 संबंधित सर्व पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना व इतर योजनांचा लाभ घ्यावा. या संबंधित अर्जाचे नमुने व सविस्तर माहिती www.dhepune.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या बाबत काही अडचणी आल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन सह संचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment