जळगाव, दि. २८-
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा
गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या गौरवदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयात एक दिवशीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात
वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे, तसेच मराठी
भाषा समृध्द होण्यासाठी लिहिण्यात आलेल्या विविध ग्रंथांचा समावेश करण्यात आला
होता.
यावेळी
सुदाम पाटील, संचालक, जळगाव जिल्हा सहकार बोर्ड, श्री. प्रमोद पाटील, ग्रंथालय चळवळीशी
संबंधित असलेले वाचक व अभ्यासक यांचेसह प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी,
जळगाव, श्री. ठाकूर, श्री. शिंदे, श्री. चौधरी, श्री. मगन पाटील उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment