जळगाव, दि. 16 - लोकहित को. ऑप हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर ने
सर्वसामान्य रुग्णांचे लोकहित जोपासून त्यांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध
करुन द्यावी. असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केले.
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच सुरु
होणाऱ्या लोकहित को. ऑप हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरची नोंदणी सहकार विभागाकडे
करण्यात आली आहे. या सेंटरला नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम येथील जिल्हा
उपनिबंधक कार्यालयात सहकार राज्यमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा परिषद सदस्य
पवन सोनवणे, सेंटरचे मुख्य प्रवर्तक डॉ. एस. एस. राणे, यांचेसह प्रवर्तक सुनील
पाटील, डी. एन. पाटील, छबीलदास शहा, यु. डी. चौधरी, एन. एस. पाटील, डॉ. प्रताप
जाधव, संजय शहा, अरुण भारंबे, धनाजी राणे, डॉ. सुरेश राणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना राज्यमंत्री श्री.
पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात सर्वसामान्यांना नागरीकांना माफक दरात आरोग्यसेवा
मिळतांना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील मान्यवरांनी एकत्र येऊन
आरोग्य, सेवा आणि सहकार या त्रिसुत्रीवर आधारित लोकहित को. ऑप हॉस्पिटल ॲन्ड
रिसर्च सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून सामाजिक भावना जोपासून
व लोकहित नजरेसमोर ठेवून गोरगरीब जनतेला अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन
द्यावी. लोकहितास प्राधान्य देणाऱ्या सेंटरला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही
राज्यमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
यावेळी बोलतांना जिल्हा उपनिबंधक विशाल
जाधवर म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनशैलीमुळे आजारांच्या
प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरीकांना माफक दरात उपचार उपलब्ध व्हावे.
यासाठी सहकारी तत्त्वावरील रुग्णालय असावे असा विचार मनी बाळगून शहरातील काही
मान्यवरांशी याबाबत चर्चा केली असता लोकहित सेंटरने सेवाभाव जोपासण्याची तयारी
दर्शविली व सहकारी तत्वावरील रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले. त्यानुसार आज या संस्थेची नोंदणी करण्यात आल्याचे सांगितले.
लोकराज्य मासिकाच्या साहित्य संमेलन अंकाचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र
शासनाचे मुख्यपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा फेब्रुवारी 2018 चा अंक हा
साहित्य संमेलनावर आधारित असून या अंकाचे प्रकाशन आज सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास
बोडके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर, सह दुय्यम निबंधक (मुद्रांक)
सुनील पाटील, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे आदि
उपस्थित होते.
|
लोकहित
सेंटरचे मुख्य प्रवर्तक डॉ. राणे म्हणाले की, संस्थेच्या वतीने गरजू
विद्यार्थ्यांकरीता मोफत जेवण व निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
त्याचबरोबर संस्थेचे 18 हजार ग्रंथ व पुस्तके असलेले पॉल हॅरिस सुसज्ज ग्रंथालय व
लोकहित वाचनालय आहे. त्याचबरोबर संस्थेच्यावतीने जिल्ह्यात सात लोकहित दवाखाने, 7
माफक दरातील लोकहित जेनरिक मेडिकल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता आर्थिक मदत
करण्यासाठी लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी सहाय्य योजना आदि उपक्रम
राबविण्यात येत आहे. आता गोरगरीब जनतेला माफक दरात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी
लोकहित को. ऑप हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरची नोंदणी केली असून या सेंटरच्या
माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यमंत्री
श्री. पाटील यांचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी तसेच लोकहित सेंटरच्यावतीने
मुख्य प्रवर्तक डॉ. राणे यांनी तर सहकार कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांनी
मंत्रीमहोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम. पी.
देवरे यांन केले.
000
No comments:
Post a Comment