जळगाव, दि. 1 - राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या 11 मार्च रोजी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. विशेषत: ग्रामीण व अति जोखमीच्या भागात ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. या मोहिमेतंर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 3 लाख बालकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी बैठकीत दिली तसेच केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, महापालिका आरोग्य विभागाच्या श्रीमती डॉ. उगले यांचेसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या 11 मार्च रोजी जिल्हयातील शून्य ते पाच वर्षाच्या आतील 2 लाख 98 हजार 154 बालकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 2 हजार 59 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून 5 हजार 567 कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 406 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. लसीकरणाचे साहित्य सर्वांना वेळेत मिळण्यासाठी 300 मोबाईल टिम नेमण्यात आल्या आहेत. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, खाजगी वाहतुक स्थानकांवर लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाजाराचे ठिकाणी, नर्सिंग होममध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच मजूर वस्तीच्या ठिकाणी विविध पथकामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. आवश्यक असेल त्या भागात रात्रीच्यावेळीही लसीकरणाची सोय करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलीओची लस देऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नियमित लसीकरणाचाही आढावा घेतला.
000

No comments:
Post a Comment