Thursday, 15 March 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


            जळगाव, दि. 15 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शनिवार दि. 17 मार्च 2018 रोजी सकाळी 4.50 वाजता अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव, जि. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.00 वा. चाळीसगाव पंचायत समितीमार्फत समृद्ध महाराष्ट्र कल्याण योजनेतील कामांचे वाटप व उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता चाळीसगाव येथून शासकीय / खाजगी वाहनाने श्री. क्षेत्र शनी महाराज मंदीर नस्तापूर ता. नांदगाव जि. नाशिककडे प्रयाण. रात्री 10.00 वा. दोंडाईचा जि.धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 12.00 वा. चाळीसगाव जि. जळगाव आगमन व राखीव.
            रविवार दि. 18 मार्च 2018 रोजी पहाटे 12.40 वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                                         00000

No comments:

Post a Comment