जळगाव,
दि. 26 - नाविण्यपूर्ण योजनेतून
जिल्ह्यातील सात लाभार्थ्यांना सन
2017-18 या वर्षात 1
हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन योजनेतंर्गत 8 लाख 43 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे वाटप आज जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
एक
हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन योजनेतंर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात
येतो. या योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रति युनिट 2 लाख 25 हजार प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 1 लाख 12 हजार 500 तर अनूसूचित जाती/जमातीच्या लाभार्थीना प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के म्हणजेच 1 लाख 68 हजार 750 या मर्यादेपर्यत शासकीय अनुदान देण्यात येते.
सन 2017-2018 या वर्षात नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत
जिल्ह्यातील सात लाभार्थीनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार 1 हजार मासंल कुक्कुट पक्षी संगोपन यासाठी पक्षीगृहाचे बांधकाम 40 दिवसांचे आत केलेले आहे. अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाचा देय आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी,
जळगांव यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या सात लाभार्थ्यांना शासकीय अनुदानाच्या धनादेशाचे वाटप आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
डॉ. एस. जे. गायकवाड, जिल्हा परिषदेचे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. एस. इंगळे, सात तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत खुल्या प्रवर्गातून
जिल्ह्यातील श्री.प्रकाश बाबुराव पाटील, रा. भोरटेक, ता. भडगांव,
श्री. प्रविण प्रकाश पाटील, रा. म्हसावद, ता. जळगांव, श्रीमती शेंवताबाई आनंदा पाटील, निमखेडी, ता. मुक्ताईनगर, श्री. सुरेश बाबुराव पाटील, रा. सारवे, ता.
धरणगांव, श्री. गुलाबसिंग चंद्रसिंग पाटील, रा. जळू, ता. एरंडोल, सौ. संगिता राजेंद्र बारी, रा. शेंदूर्णी, ता. जामनेर यांना प्रत्येकी 1 लाख 12
हजार 500 रुपयांचा तर श्रीमती संगिता तुकाराम अढांगळे, रा. विटवा, ता.
रावेर यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून 1 लाख 68 हजार 750 रुपयांच्या धनादेशाचे
वाटप करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment