· महानिर्मितीच्या
भुसावळ ६६० मेगावाट विद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
· महावितरणचे
जळगाव मंडळ अंतर्गत ८ प्रकल्पांचे भूमिपूजन
· महापारेषणचे
जळगाव जिल्ह्यातील ४ प्रकल्पांचे भूमिपूजन
जळगाव, दि. २९ - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या भुसावळ येथील 660 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प 2x500 मेगावॅट प्रवेशव्दाराजवळ,राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 जवळ, दीपनगर, भुसावळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या ठिकाणी, महावितरणच्या जळगाव परिमंडळ अंतर्गत पंडित
दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत दहिवद (ता.अमळनेर), तालखेडा (भोटा)
ता. मुक्ताईनगर व बक्षीपूर (ता. रावेर) आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत सावदा, रावेर, फैजपूर,
अमळनेर, भडगांव (वडदे) या ३३/ ११ के.व्ही. उपकेंद्राच्या कामांचे
भूमिपूजन तसेच महापारेषणच्या२२० केव्ही उपकेंद्र केकतनिंभोरा ता. जामनेर, २२०
केव्ही उपकेंद्र विरोदा ता. यावल, १३२ केव्ही उपकेंद्र कर्की ता. मुक्ताईनगर, १३२
केव्ही उपकेंद्र कोथळी ता. भडगावचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून
राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य
उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती
उज्ज्वलाताई पाटील या उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. (नाना) पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व हिरे, श्रीमती स्मिताताई वाघ, श्री. चंदुभाई पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील उपस्थित राहणार
आहे.
या
कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय
संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार,
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मितल यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment