Thursday, 29 March 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. 29 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार दि. 30 मार्च, 2018  रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 30 मार्च, 2018  रोजी सकाळी 6 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6 वा. 10 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 6 वा. 30 मि.नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. 10 मि. नी दिपनगर, ता. भुसावळकडे प्रयाण. सकाळी 10 वा. पंडीत दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती व एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत 33/11 केव्ही उपकेंद्राच्या कामांचा ई-भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प प्रवेशव्दाराजवळ, दिपनगर, भुसावळ, सकाळी 11 वा. जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा. 30 मि. नी. मसाले प्रक्रीया प्रकल्पाचे उदघाटन कार्यक्रमास व डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक उच्चतंत्र पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जैन हिल्स, जळगाव. दुपारी 2 वा. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत जळगाव शहर पाणी पुरवठा व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा कामाचा ई - भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 ते 5 वाजेपर्यत राखीव. सायं 5 वा. रावेरकडे प्रयाण. सायं 6 वा. रावेर येथे आगमन व श्री. संतोषभाऊ महाजन यांचे गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- राजे शिवाजी चौक, रावेर, सायं 7 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००

No comments:

Post a Comment