Saturday, 3 March 2018

जवाहर नवोदय विद्यालयात नववीच्या प्रवेशासाठी 5 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत



          जळगाव, दि. 3 - जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये इयत्ता नववीच्या रिक्त जागासाठी प्रवेश परीक्षा शनिवार 19 मे, 2018 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, भुसावळ या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणारआहे. या परिक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल, 2018 आहे. अशी माहिती प्राचार्य श्री. वे. नारायण राव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.  
         जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय समिती, मानव संसाधन विकास मंत्रालयातंर्गत असून केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ भारत सरकार संचालित सी.बी.एस.ई. पाठ्यक्रम असणारी ग्रामीण व शहरी भागातील मुलामुलीसाठी दर्जेदार व आधुनिक तंत्राचा अध्यापन अध्ययन प्रक्रियेत समावेश करणारी जिल्ह्यातील एकमेव शिक्षण संस्था भुसावळ येथे आहे.
       या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. प्रवेश अर्ज www.nvshq.org या संकेतस्थळावर भरावा. या परिक्षेसाठी प्रवेश पात्रता उमेदवार चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी जळगाव जिल्ह्यात शिकलेला/उर्त्तीर्ण असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे, 2002 ते 30 एप्रिल, 2006 च्या दरम्यानचा असावा. या परिक्षेच्या अधिक माहितीसाठी www.jnvjalgaon.com, www.nvshq.org या संकेतस्थळावर माहितीपत्रक उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यापूर्वी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे. तसेच अधिक माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे दुरध्वनी क्रमांक 02582-222132 वर संपर्क साधावा. 000

No comments:

Post a Comment