Wednesday, 14 March 2018

निवडणूकीचे काम उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या महिला बीएलओंचा जागतिक महिला दिनी प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार


        जळगाव, दि. 14 - सन 2017-18 या वर्षात निवडणूक आयोगामार्फत नेमून दिलेले निवडणूकीचे अत्यंत महत्वाचे कामकाज उत्कृष्ट रितीने पार पाडणा-या महिला बी.एल.ओं. चा जागतिक महिला दिनी पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद कचरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
            पाचोरा तहसील कार्यालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती भाग्यश्री बालाजी भिंगोले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2, पिंपळगाव हरे. ता. पाचोरा, श्रीमती शामल शिवाजी सुसलादे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गाळण खुर्द, श्रीमती दिपा सुभाष बोडके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारखेडे बु. ता. पाचोरा, श्रीमती मंगला गंगाराम सोनवणे, नगर परिषद, पाचोरा, श्रीमती मंगला बाळकुष्ण वाणी, जिल्हा परिषद कन्या शाळा, पाचोरा, श्रीमती रुपाली गंगाराम सोनवणे, नगर परिषद, पाचोरा, श्रीमती मंगला बाळकुष्ण वाणी, जिल्हा परिषद कन्या शाळा, पाचोरा, श्रीमती रुपाली लालचंद जैन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांद्रा, ता. पाचोरा  यांना उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री. कडनोर, निवडणुक नायब तहसिलदार, श्री. राजगुरु, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, पाचोरा उपविभाग, पाचोरा यांचेसह अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment