जळगाव, दि. २६ - सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत १ एप्रिल २०१८
पासून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांची बायोमेट्रीक
पध्दतीने तपासणी करुनच संबधीतांना धान्य वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा
पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली.
जिल्हास्तरीय
दक्षता समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत
होते. यावेळी बैठकीस जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य श्रीमती सुलभा निवृत्ती
पाटील, डॉ. श्रीमती अर्चना विशाल पाटील,
आत्माराम कोळी, सुनिल तुळशीराम जावळे आदि उपस्थित होते.
श्री. जाधव बैठकीत पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शिधापत्रिका
आधार संलग्न केल्या आहेत. अशा शिधापत्रिका धारकांस बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब
करुन स्वस्त धान्य दूकानातून धान्य व इतर वस्तू वितरीत केल्या जाणार असून यामुळे
यातील गैरप्रकारांना आळा असेल. बायोमेट्रीक पध्दत सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर
लवकरच एक कार्यशाळा आयोजित केली जाणार असून यामध्ये ही पध्दत कशी वापरावयाची याचे
सर्व संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही श्री. जाधव यांनी बैठकीच्या शेवटी
सांगितले.
000
No comments:
Post a Comment