Saturday, 17 March 2018

गुढीपाडव्याला आर. टी. ओ. कार्यालय सुरु


            जळगाव, दि.17 :- गुडीपाडव्याच्या निमित्ताने नविन वाहनांची मोठ्या प्रमाणात  खरेदी होत असते. मात्र  रविवार 18 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नागरिकांना वाहनांचा ताबा व वाहनांचे नोंदणी क्रमांक मिळणेसाठी गैरसोय होवू नये. यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव हे 18 मार्च 2018 रोजी सार्वजनिक सुट्टीच्या  (गुढीपाडव्याच्या) दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली आहे.
            तसेच सर्व वाहन वितरकांना कार्यालयीन सहायक मोटार वाहन निरीक्षक नियुक्त करुन उपरोक्त दिवशी वितरकाकडे वाहन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                       ०००

No comments:

Post a Comment