जळगाव, दि. 20 - विभागीय
सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र
लेखालिपीक प्रशिक्षण 23 एप्रिल ते 10 जुलै 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची
माहिती लक्ष्मण पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली
आहे.
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव,
अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील
लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी
अनुक्रमे 8 व 7 मोड्युल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार
अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या कोषागार कार्यालयात
माहितीसाठी उपलब्ध आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक
अधिकारी, कर्मचा-यांस प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त
कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना
पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही. त्यांना विशिष्ट मोड्युल्सना प्रवेश
घेण्याची अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे.
०००
No comments:
Post a Comment