जळगाव, दि. 13 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालयात 23 मार्च 2018 रोजी दुपारी तीन वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या डाक अदालतमध्ये टपाल वस्तु, बचत बॅंक, मनीऑर्डर प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत श्री. आर. एन. चेटुले, सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी, डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001, यांच्या नावे पाठवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
०००

No comments:
Post a Comment