जळगाव, दि. 6 - शासकीय वसतिगृहातील मुला,
मुलींसाठी नाश्ता व भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याकरीता स्पर्धात्मक दर प्राप्त
करण्याकरीता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेचा तांत्रिक लिफाफा 7 मार्च,
2018 रोजी उघडण्यात येणार होता. परंतू आता काही कारणास्तव 7 मार्च त्याऐवजी 15
मार्च, 2018 रोजी दुपारी 12 वाजता उघडण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक आयुक्त,
समाजकल्याण, जळगाव यांनी दिली आहे.
ही निविदा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक, सामाजिक न्याय
भवन, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक येथे उघडण्यात येणार आहे. तर ई- निविदेचा
व्यापारी लिफाफा उघडण्याचा दिनांक नंतर घोषित करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी
नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment