जळगाव, दि. 31 - कृषी खत विक्रेते यांना नवीन विषयांची माहिती व्हावी तसेच ग्रामीण भागात काम करताना शेतक-यांना त्यांच्या ज्ञानाची मदत व्हावी. या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत कृषी खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रम कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे सुरु करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाचे उद्घाटन आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. महाजन यांनी उपस्थितांना कोर्सविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाहेती यांनी कृषी खत विक्रेत्यांना या पदविका सर्टिफिकेटचा भविष्यात होणाऱ्या लाभाची माहिती दिली. तर निवृत्त उपसंचालक कृषी विभाग, जळगाव पी. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वर्षभर चालणाऱ्या कोर्सविषयीची ओळख करुन दिली.
मेनेज (MANAGE) हैद्राबाद व वनामती, नागपूर यांच्या मार्गदर्शनातून आत्मा, जळगाव यांच्या सहकार्याने कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे घेण्यात येत असलेला हा कोर्स 48 आठवड्यांचा असून प्रत्येक रविवारी प्रशिक्षण सत्र होणार आहे.
कृषि खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविके (DAESI) साठी श्री. पी. के. पाटील, निवृत्त उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव हे फासिलेटर (Facilator) म्हणून काम पाहणार आहेत. तर डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद हे नोडल ऑफिसर आहेत. या कृषि खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविका (DAESI) साठी जिल्ह्यातील 40 कृषि खत विक्रेते सहभागी झाले आहेत. हा कोर्स एक वर्ष कालावधीचा असून कोर्स् पूर्ण करण्याऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका देण्यात येणार आहेत. असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
०००

No comments:
Post a Comment