Monday, 19 March 2018

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहातंर्गत देण्यात आले खोल पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षण


                  जळगाव, दि. 19 - महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव द्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 14 मार्च पासून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे.
                 या सप्ताहातंर्गत आज हतनुर धरण ता. भुसावळ येथे भुसावळ, रावेर, यावल, नगर बोदवड तालुक्यातील 36 सदस्यीय शोध व बचाव पथकांसाठी पूर विमोचन पुरामुळे होणारी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी एसडीआरएफ धुळे पथकाद्वारे बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य इ. बाबतचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण हतनुर धरण परिसरात देण्यात आले. या कार्यशाळेसाठी एसडीआरएफ धुळे टीमचे लिडर पोलीस निरिक्षक श्री. के. यू. पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. रामलाल शर्मा व श्री. इश्वर सरदार व त्यांची टिम उपस्थित होती.
            तसेच दुपारच्या सत्रात येथील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रिडा संकुलातील जलतरण तलावात प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ठाणे येथील स्कुबा डायव्हीग मास्टर ट्रेनर डॉ. विश्वास सापटणेकर यांनी त्रिस्थाच्या स्कुबा डायव्हीग पथकास खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याबाबत स्कुल डायव्हीग सेटसह प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उप‍स्थित होते.
            स्कुबा डायव्हीगच्या दुसऱ्या सत्रात डॉ. सापडनेकर यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्कुबा डायव्हीग साहित्याबाबत बेसीक प्रशिक्षण दिले.
या सप्ताहाचा समारोप उद्या (20 मार्च) जिल्हा नियोजन सभागृह, जळगांव येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या समारंभात जळगाव, जामनेर, एरंडोल, चोपडा, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील शोध व बचाव पथके सहभागी होणार आहे. त्यांना उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ तसेच आकस्मीत आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप आदि बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी एन. आर. रावल यांनी दिली.
000

No comments:

Post a Comment