जळगाव,
दि. २० -
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या एक लक्ष ३७ हजार ५४४ कार्डधारक लाभार्थ्यांसाठी
एप्रिल महिन्याचा गहू, ज्वारी, मका आणि तांदूळ या धान्याचा साठा उपलब्ध झाला आहे.
या योजनेतंर्गत गहू २२ हजार १० क्विंटल, ज्वारी ८२४.५० क्विंटल, मका ३ हजार २९५.५०
क्विंटल प्रति एक रुपयर किलो दराने असे एकूण २६ हजार १३० क्विंटल व तांदूळ २२ हजार
१० क्विंटल प्रति तीन रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
पात्र लाभार्थी कार्डधारकांनी आपल्या
जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment