Wednesday, 28 March 2018

शेंदुर्णी येथे नव्याने नगरपंचायत स्थापन, अधिसुचना जाहिर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या पाठपुराव्यास यश जामनेर तहसिलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक

             जळगाव, दि. 28 - जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) ग्रामपंचायत येथे नव्याने नगरपंचायत स्थापन करण्याबाबतची अधिसुचना आज शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी जाहिर केली आहे. शेंदुर्णी ग्रामपंचायत येथे नगरपंचायत स्थापन होण्यासाठी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सतत पाठपुरावा केला होता. याबाबतची अधिसुचना जाहिर झाल्याने त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. 
           शेंदुर्णी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि या क्षेत्राकरिता शेंदुर्णी नगरपंचायत गठित केली आहे. तसेच नव्याने गठित शेंदुर्णी नगरपंचायतीची यथोचित रचना होईपर्यंत तहसिलदार, जामनेर यांची शेंदुर्णी नगरपंचयतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
                                                                   000

No comments:

Post a Comment