Thursday, 8 March 2018

जागतिक महिला दिनानिमित्त कौशल्य विकास विभागाने केले महिलांना विविध योजनांचे मार्गदर्शन





            जळगाव, दि. 8 - जागतिक महिला दिनानिमित्ता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या विविध बाबींबाबत मार्गदर्शन केले.
            जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. बी. वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक श्रीमती. अनिसा तडवी यांनी केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. वाघमारे यांनी महिलांनी रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त करुन सन्मान प्राप्त करावा. तसेच जास्तीत जास्त महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक श्री. गिलाणकर यांनी उपस्थित महिलांना मुद्रा लोन, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. महिला अधिक सक्षम, स्वाभिमानी, प्रामाणिक असल्याने बँक सुद्धा त्यांना कर्ज पुरवठा करण्यास प्राधान्य देते. त्यामुळे महिला लाभार्थी यांनी व्यवसायासाठी कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे आवाहन करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
श्रीमती. अनिसा तडवी यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण स्त्रीशक्तीची जाणीव ठेवुन जीवनात स्वत: काहीतरी करुन दाखविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांना महाराष्ट्र शासनाची मुद्रा लोन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत रोजगार नोंदणी आदि योजनांची माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment