Tuesday, 6 March 2018

जागतिक महिला दिनी कौशल्य विकास विभागाच्यावतीने महिलांना देण्यात येणार विविध योजनांची माहिती

         जळगाव, दि. 6 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अनिसा तडवी, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी दिली आहे.
          या कार्यक्रमात महिला लाभार्थीसाठी मुद्रा लोन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत रोजगार नोंदणी आदि योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
           या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांनी 8 मार्च, 2018 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती तडवी, सहाय्यक संचालक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                   ०००

No comments:

Post a Comment