जळगाव,
दि. 19 - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
पार पडला.
यावेळी
महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत
विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. आजच्या
लोकशाही दिनात सहा अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तालुका पोलीस स्टेशन यांचेशी
संबंधित एक, संजय गांधी निराधार योजना विभागाशी संबंधित तीन, जळगाव शहर
महानगरपालिकेशी संबंधित एक तर महसूल विभाग, टंचाई शाखेशी संबंधित एक असे एकूण सहा अर्ज प्राप्त झाले
आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे, सदस्य सचिव तथा जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी रमेश बी. काटकर, संरक्षण अधिकारी आरती साळूंके, मुख्य
कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आर.आर.तडवी, तहसिलदार, संजय गांधी निराधार
योजना, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे अर्ज
पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रमेश काटकर,
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.
000
No comments:
Post a Comment