Friday, 13 September 2019

शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्थसहाय्यासाठी 16 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, दि. 12 - भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम, विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
समान निधी योजना सन 2018-19 साठी राज्य शासनाच्या 50 टक्के व प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहाय्य या योजनेसाठी करावयाचा अर्ज राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrlf.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम, विस्तार व नुतनीकरणासाठीचा प्रस्ताव विहित नमुद प्रस्तावात आवश्यक त्या कागदपत्रांसह इग्रंजी, हिंदी भाषेत चार प्रतीत सबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 16 सप्टेंबर, 2019 पर्यंत पाठवावा. असे आवाहन सुभाष राठोड, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

No comments:

Post a Comment