चाळीसगाव दि. 24 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकामी नियुक्त भरारी व स्थिर पथकांनी
आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. अशा सूचना 17-चाळीसगाव विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2019 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव
लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,चाळीसगाव येथे आयोजित
बैठकीत सर्व संबंधितांना केल्यात. या बैठकीत आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे
पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथके व स्थिर देखरेख पथके स्थापित
करण्यात आली आहे.
या बैठकीस तहसिलदार अमोल मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस
निरिक्षक आशिष रोही, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे,
मेहुणबारे पोलीस ठाणेचे पोलिस निरिक्षक सचिन बेंद्रे, सहाय्यक गट विकास अधिकारी
पवार, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवासी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे उपस्थित
होते.
पथक प्रमुखांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करावी.
यासाठी नेमुन दिलेल्या तपासणी नाक्यांवर अडथळे उभारावेत. आचारसंहिता भंगाची तक्रार
आल्यास ती आचारसंहिता कक्षाकडे दाखल करावी. आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारीची
माहिती आपणास मिळाल्यास तीची सुध्दा नोंद घेवून ती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावी. सर्व पथकांनी आप-आपल्यालावर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सुचनाही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. साताळकर यांनी
यावेळी दिल्या. यावेळी 17-चाळीसगाव
विधानसभा मतदारसंघासाठी प्राधिकृत
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment