Saturday, 28 September 2019

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॅान्फरन्स द्वारे संवाद




         जळगाव.दि.28:-आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  आज जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी, बऱ्हाणपूर व खरगोण येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यासोबत व्हिडीओ कॅान्फरन्स द्वारे बैठक घेवून संवाद साधुन निवडणूकीबाबत चर्चा केली.
        बडवाणीचे जिल्हाधिकारी अनिल तोमर, बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी राजेशकुमार व खरगोणचे जिल्हाधिकारी गोपालचंद डॅड तसेच बडवाणी येथील पोलीस अधिक्षक डी. आर टेनीवार, बऱ्हाणपूरचे पोलीस अधिक्षक अजय सिंग, खरगोणचे पोलीस अधिक्षक सुनिलकुमार यांना मध्यप्रदेशातून अवैध मद्यसाठा, अवैध शस्त्र, अवैध वाहतुक होणार नाही यावर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच मध्यप्रदेशातून येणाऱ्या वाहनांची  नाकाऱ्यावर तपासणी करताना काळजी घ्यावी व सहकार्य करावे असे सांगितले.  
         यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपजिल्हाधिकारी निवडणुक तुकाराम हुलवळे, मोटार वाहन निरीक्षक विलास चौधरी, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सी. पी. निकम आदि उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment