Friday, 20 September 2019

अल्पसंख्याक समाजाच्या योजनांचे एकत्रिकरण झालेबाबत


जळगाव, दि. 20 - अल्पसंख्याक समाजाच्या संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना (आयडीएमआय) व मदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योजना (एसपीक्युईएम) या दोन योजनांचे अल्पसंख्याक संस्था/ मदरसां मधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्‍यासाठी  योजना (एसपीईएमएम) या केंद्र शासन पुरस्कृत योजनेत एकत्रिकरण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिली आहे.
अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे SPEMM (Scheme For Providing Quality Education in Mandrasa / Minorities योजने विषयक दि.11 सप्टेंबर,2019 चे पत्र निरंतर शिक्षण विभाग, जळगाव यांना प्राप्त झाले असून त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून IDMI व SPQEM या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन SPEMM ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेतंर्गत IDMI योजनेसाठी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र संस्थांना व SPQEM या योजनेसाठी धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्ड यांचेकडे नोंदणी केलेल्या मदरसांना प्रस्ताव सादर करता येतील. या योजनाेसाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दि. 10 फेब्रुवारी, 2009 चे शासन निर्णयामधील अटी, शर्ती व निकष यांच्या अधीन राहून निकषात बसत असलेल्या जळगांव जिल्ह्यातील पात्र संस्थांनी/मदरसांनी प्रस्ताव निरंतर शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांना सादर करावी. तसेच अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जिल्हा परिषद, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण ) यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        0000

No comments:

Post a Comment