Wednesday, 25 September 2019

एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात 30 सप्टेंबर पासून दिवसातून दोन वेळा बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध होणार


             जळगाव. दि. 25 (जिमाका) - एरंडोल तालुका व परिसरातील रुग्णांची व नागरीकांची गरज ओळखून शहरी/ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा/आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी. याकरीता 30 सप्टेंबर, 2019 पासून ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागाच्या वेळेत बदल करून सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अशाप्रकारे दिवसातून दोन वेळेस ओपीडी सुरू राहणार आहे.
            एरंडोल आणि परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-1, ग्रामीण रुग्णालय, एरंडोल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment