Wednesday, 18 September 2019

रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

            जळगाव, दि. 18 -जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगावमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीने जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित केली आहे. त्यानुसार रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेंतर्गत उमेदवारांकरिता मोफत अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
           किमान कौशल्य विकास कार्यक्रमासाठी  जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून समुपदेशन/प्रशिक्षण (Counselling/Training) मधील Get Counseled ऑप्शनमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म/ माहिती भरून  नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
            या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा, त्याचे वय 15 ते 45 वयोगटातील असावे, प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रताधारक असावा. रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थी उमेदवारांना शासनामार्फत संपूर्णपणे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
            प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर मुल्यमापन करुन प्रशिक्षणार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र (SSC/NCVT/MSCVT) देऊन संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी     https://kaushalya.mahaswayam.gov.in       वेबपोर्टलवर मोफत नोंदणी करावी अथवा कार्यालयात येऊन विहीत फॉर्म भरुन द्यावा.
उमदेवारांना प्रशिक्षणाचा व प्रशिक्षण संस्थांचा तपशिल - क्षेत्र व तालुकानिहाय कार्यरत अभ्यासक्रमांची माहिती वेबपोर्टलवर Find a Center या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत  0257-2269605 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव श्रीमती अ.ला.तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                          000

No comments:

Post a Comment