जळगाव, दि. 30: - विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोन उमेदवारांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल
केले आहे. अमळनेर व पाचोरा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक उमेदवाराने अर्ज दाखल
केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास
सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 11 विधानसभा क्षेत्र असून यामध्ये पहिल्याच दिवशी 198
नामनिर्देशनपत्र वितरीत झाले. तर आज दुसऱ्या दिवशी चोपडा-17, रावेर-39, जळगाव शहर- 51, अमळनेर-15,
एरंडोल-10, पाचोरा-14 नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहिती सर्व संबंधित
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment