जळगाव, दि. 11 - विधानसभा निवडणूकी कामी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूकीत नेमूण
दिलेली कामे बिनचूकपणे पार पाडण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. कोणालाही
काहीही शंका, अडचणी असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी
अप्पर जिल्हादंडाधिकारी वामन कदम, विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी विनय
गोसावी, राजेद्र कचरे, श्रीमती शुभांगी भारदे, डॉ.अजित थोरबोले, श्री. साताळकर,
श्रीमती सिमा अहिरे, दिपमाला चौरे, राजेंद्र वाघ, प्रसाद मते, सुनिल सुर्यवंशी,
जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी बोरोले, सहाय्यक सूचना व विज्ञान अधिकारी महेश
पत्की, चिटणिस मंदार कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत, सहाय्यक
संचालक स्थानिक लेखा निधी विनोद चावरिया, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसिलदार,
निवडणूक नायब तहसिलदार आदिंसह अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
डॉ. अविनाश ढाकणे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, निवडणूकी संदर्भातील
माहिती सर्वांनी व्यवस्थीतपणे समजून घ्यावी. निवडणूकी दरम्यान सर्व केंद्रस्तर
अधिकाऱ्यांचे (BLO) भ्रमणध्वनी
क्रमांक निवडणूकीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे असणे आवश्यक आहे.
मतदान पार पडल्यानंतर मतदानयंत्र (EVM) ठेवायचे स्टाँगरूम, मतमोजणी केंद्र योग्य
असल्याची खात्री निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी
करावी.
मतदानपूर्वी
सर्व मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहचतील याची खात्री केंद्रस्तर अधिकाऱ्यांकडून
करून घेण्याच्या सूचनाही डॉ. ढाकणे यांनी उपस्थित सर्व अधिकारी यांना दिल्यात.
प्रांताधिकारी
राजेंद्र कचरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी
निवडणूक जाहिर झाल्यापासून ते निवडणूकीतील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरून घेणे
आणि उमेदवारी अर्ज दाखल करून घेताना लागणारे आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे,
सूचक, निवडणूकीसाठी उमेदवारांना द्यावयाची चिन्हे (सिम्बॉल) इत्यादिंविषयी सविस्तर
माहिती दिली. यासह इतर अधिकाऱ्यांनीही निवडणूकीविषयी विविध विषयांची माहिती
उपस्थितांना दिली.
000
No comments:
Post a Comment