जळगाव, दि.27 (जि.मा.का ) - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च
निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरिक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक
अनुक्रमे असे आहेत. या सर्व निरिक्षकांची निवास व्यवस्था पद्मायल शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथे करण्यात आली आहे.
10-चोपडा, 11-रावेर व 12-भुसावळसाठी श्री. हरीसन ॲन्टोनी,
भ्रमणध्वनी-9446824695, निवास व्यवस्था - मुक्ता येथे आहे. 13-जळगाव शहर व 14-जळगाव
ग्रामीण साठी श्री.मम्म्नोन अलाम, भ्रमणध्वनी-9399657749, निवास व्यवस्था -
बहिणाबाई येथे आहे. 15-अमळनेर व 16-एरंडोलसाठी श्री. बिस्वनाथ दास, भ्रमणध्वनी-8902350384,
निवास व्यवस्था - सावित्री येथे आहे. 17-चाळीसगाव व 18-पाचोरासाठी श्री.अनंथ आर, भ्रमणध्वनी-9003145102,
निवास व्यवस्था - जीजाऊ येथे आहे. आणि 19-जामनेर व 20-मुक्ताईनगरसाठी श्री.देवाशीष
पॉल, भ्रमणध्वनी-9895466916, निवास व्यवस्था -
फातीमाबी येथे आहे.
तरी मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रारी अथवा
अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क
साधावा. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव यांनी कळविले
आहे.
000
No comments:
Post a Comment