जळगाव, दि. 20 - तृणधान्यांमध्ये तंतुमय
पदार्थ, प्रथिने, लोह, कॅल्शियम, जस्त, मॅग्निशियम ही पौष्टिके भरपुर प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर,
मधुमेह, स्थौल्य, थायरॉईउ, ह्रदयरोग टाळण्यासाठी पौष्टिक
तृणधान्य खाणे काळाची गरज
असल्याचे प्रतिपादन आयुर्वेद व आहार तज्ञ श्री.अनंत पाटील यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (2019-20) अंतर्गत पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे. या विषयावरील जिल्हास्तरीय
पूर्वतयारी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमास मनपा आयुक्त श्री. उदय टेकाळे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे
अध्यक्ष भरतदादा अमळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील बोलत
होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त श्री. उदय टेकाळे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन
केले व उपस्थितांनी पौष्टिक तृणधान्यांच्या प्रदर्शनीला
भेट दिली. उपस्थित पाहुण्यांना पौष्टिक तृणधान्यासंबंधीत
पुस्तकांची आगळीवेगळी भेट यावेळी देण्यात आली.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, चविष्ट अन्न पौष्टिक नसते व पौष्टिक अन्न हे चविष्ट नसते हा गैरसमज खोडुन टाकला पाहीजे. त्याकरीता गृहिणींनी पौष्टिक तृणधान्यांच्या साहाय्याने चविष्ट अशा विविध पाककृती तयार करण्यासाठी त्यांनी आवाहन
केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषि उपसंचालक श्री. भोकरे
म्हणाले की, शाश्वत जीवनासाठी आहार पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. पारंपारीक पौष्टिक तृणधान्यांच्या माध्यमातुन ते सहज शक्य होणार आहे. याकरीता नागरीकांनी पौष्टिक तृणधान्यांच्या पदार्धाचे
सेवन करण्याचे आवाहनही त्यांनी
उपस्थितांना केले. श्री. एन. अशोक
यांनी पौष्टिक तृणधान्याप्रमाणे
मानवाला शरीराच्या आरोग्यासाठी
दैनंदिन जीवनात हास्य विनोद आवश्यक असल्याचे सांगीतले. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना त्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी उदाहरणासह त्यांनी सादर
केलेल्या एकपात्री प्रयोगातुन
पटवून दिले.
या
कार्यक्रमास 200 पेक्षा अधिक महिलांनी उपस्थित राहुन पौष्टिक तृणधान्यातील पदार्थात
असणारे महत्वाचे तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे व विविध आजारांपासुन मिळणारी
मुक्तता देखील महत्वाची असुन दररोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचे असलेले महत्व पुर्णपणे आत्मसात केले. जनजागृतीसाठी चविष्टम् या व्हाटसअप गृप या कार्याकरीता सुरू केल्याचे सागितले. या
कार्यक्रमासाठी अमित पाटील, सुनिल पाटील, किरण पाटील, डॉ. सौ. विशाखा पाटील यांचे सहकार्य लाभले.
000
No comments:
Post a Comment