जळगाव, दि. 20 - साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाने महामंडळामार्फत मातंग व
तत्सम समाजातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था,
पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोग पुर्व परिक्षा प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे
निश्चित केले आहे. याकरिता महामंडळाकडून विद्यार्थ्यांची निवड करणे व
प्रशिक्षणार्थीची परिक्षा घेऊन सक्षम अशा विद्यार्थ्यांना पुर्व प्रशिक्षणासाठी
पात्र ठरवुन प्रशिक्षणार्थीची यादी तयार करण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन
करण्यात येत आहे.
पदवीधर/पदव्युत्तर परिक्षा 50 टक्के व
त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेले विद्यार्थी यांनी स्वत: आवश्यक सर्व
कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे, पदवीधर/पदव्युत्तर 50
टक्के व त्यापेक्षा जास्त गुणची मार्कशीट, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,
रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, दोन फोटोसह साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव, डॉ. बाबासाहेब आंबडेकर
सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातणुर कॉलनी, जळगाव फोन
नं. 0257-2263294, ईमेल आयडी dmslasdcjalgaon@gmail.com असे जिल्हा व्यवस्थापक,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जळगाव यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment