जळगाव, दि. 24 - आगामी विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2019 आणि त्या अनुषंगीक विविध राजकीय पक्षांचे आणि अपक्ष
उमेदवारांकडून होणारा प्रचार, सभा आणि रोड शो लक्षात घेता संबंधित पोलीस
स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सभा अथवा जनसभांचे आयोजन करण्यात
येवू नये. निवडणूक कार्यकाळात निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इतर सर्व वाहनांना
निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी संपूर्ण
जिल्हा हद्दीत 27 ऑक्टोंबर, 2019 पर्यंत कलम 144 (1) (2) जारी करण्यात आले आहे.
असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
000
No comments:
Post a Comment