Tuesday, 6 August 2024

शासकीय कार्यालयांनी 'जेम ' प्रणाली द्वारे वस्तू व सेवा खरेदी बंधनकारक ; या संदर्भात 12 ऑगस्ट रोजी बैठक

         जळगाव दि. 6 ( जिमाका ) –  केंद्र शासनाने विकसित केलेल्या गवहर्नमेट ई – मार्केटप्लेस  (gem) पोर्टलची कार्यपध्दती, राज्य शासनास वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यात शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार gem पोर्टलचा वापर  अधिकाधिक वापर करुन पोर्टलव्दारे वस्तु व सेवांची खरेदी करण्यास शासकीय  निमशासकीय विभाग व स्वायत्त  संस्था यांना बंधनकारक केलेले आहे.

        उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचे 14 मार्च 2023 च्या पत्रान्वये सुधारीत खरेदी धोरणातील तरतुदीचो  काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार शासन निर्णय 7 मार्च, 2024 अन्वये Gem पार्टलवर उपलब्ध असणा-या वस्तु व सेवांची खरेदी बंधनकारक करण्यात आलेली आहे.

            जिल्हयामध्ये Gem प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकरीता दिनांक 12 ऑगस्ट, 2024 रोजी अल्पबचत हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11.00 वाजता घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय/महामंडळ/स्वायंसंस्था यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित रहावे असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment