जळगाव दि. 6 ( जिमाका ) - सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा”चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक
पद्धतीस चालना देउन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व
इतर तेलबिया
पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया
उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५
या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
कृषी यांत्रिकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता
येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यानी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या
वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000000
No comments:
Post a Comment