Tuesday, 6 August 2024

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव दि. 6 ( जिमाका ) -  अनुसुचीत जाती व नवबौध्द लोकांना स्वयंमरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. महामंडळातंर्गत बँकेच्या माध्यमातुन 50% अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविली जाते. सन 2024-2025 या आर्थिक वर्षाकरीता शासनाकडुन जळगाव जिल्ह्याकरीता 50% अनुदान योजनेतंर्गत 65 लाभार्थी व बीज भांडवल योजनेतंर्गत 65 लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात येवून कर्जमागणीचा अर्ज सर्व कागदपत्रासह सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment