Thursday, 1 August 2024

कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 जळगाव दि. 1 ( जिमाका ) राज्यात दरवर्षी कृषि विभागमार्फत कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती / संस्था / गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि रत्न पुरस्कार वंसतराव नाईक कृषि भूषण, जिजामाता कृषि भूषण, कृषि भुषण (सेदिय शेती), वंसतराव नाईक शेती मित्र, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना पदम श्री. डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन  करण्यात येत आहे.  असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        0000000000

No comments:

Post a Comment