जळगाव, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) :- ९ ऑगस्ट २०२४ हा दिवस संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. या वर्षीही सदर कार्यक्रम ९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , यावल जि. जळगाव चोपडा रोड, सार्वजनिक बांधकाम विभाग आवार येथे शासकीय कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी , सन्माननीय लोकप्रतिनिधी आदिवासी सेवक आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, शासकीय आश्रमशाळा/ वसतिगृहातील विद्यार्थी/ विद्यार्थीनी, पंचक्रोशीतील चार ते पाच हजार आदिवासी बंधू – भंगिनी तसेच सर्व पत्रकार उपस्थित राहण्याबाबत जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment