Wednesday, 14 August 2024

मिनी मॅरेथॉन ‘एक धाव सुरक्षेची’














           जळगाव दि. 14 (जिमाका) - जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉन चे आयोजन करण्यात येत आहे.

            जिल्ह्यात आज दि. 14 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 07.30 वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयक व्यापक जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन - एक धाव सुरक्षेची हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. मिनी मॅरेथॉन स्पर्धेत निवासी उपजिल्हाधिकारी, श्री. राजेंद्र पाटोळे,  उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. रवि नाईक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नरवीरसिंह रावळ, एनसीसी अधिकारी, एनएसएस अधिकारी आणि जिल्हास्तरीय विविध आपदा मित्र /सखी, एन.एस.एस., स्वयसेवक एन.सी.सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला व पुरुष होमगार्डसह सुमारे 175 धावक सहभागी झालेले होते. 

0000000000

No comments:

Post a Comment