जळगाव दि. 24 ( जिमाका ) - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव / मॉडेल करीअर सेंटर, जळगाव तर्फे जिल्हयातील युवक/युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण - शैक्षणिक अर्हता -१) १२
वी पास, प्रतिमाह विद्यावेतन - रु.६०००/-
२) आय.टी.आय. / पदविका रु. ८०००/- ३) पदवीधर / पदव्युत्तर रु.१०,०००/-
उमेदवारांचे
शैक्षणिक अर्हतेनुसार वरील प्रमाणे विद्यावेतन देण्यांत येणार आहे. या योजनेसाठी
उमेदवाराची कमीत कमी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी
१२वी/ आय.टी.आय/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. मात्र
शिक्षण चालू असलेले उमेदवार तसेच शिकाऊ उमेदवारी NAPS/MAPS अंतर्गत प्रशिक्षण
घेतलेले उमेदवार या योजनेत सहभागासाठी पात्र असणार नाहीत. प्रशिक्षणाचा कालावधी
सहा महिने राहील.
उमेदवार
हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उदयोजकता
आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे आणि
उमेदवारचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे.
याबाबत
काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार
(सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५
वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत
दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, प्र. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
जळगाव रा.नि. वाकोडे, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
००००००००००
No comments:
Post a Comment