Saturday, 3 August 2024

अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान 2024-25 साठी अनुदान मागणीचे प्रस्ताव साद करावे

 जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा)-  जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यावतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान सन 2024-25 साठी अनुदान उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय / संस्था संचलित अनुदानीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये / वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्राम पंचायत, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडी या ठिकाणची  लोकसंख्या कमीत कमी 500 अथवा त्या ठिकाणी अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा / महाविदयालय / वस्तीगृहे यांच्याकडे शासकीय नियमानुसार 1000 स्वेअर फुट जागा  जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करुन शकतात.

 सदर   व्यायामशाळा विकास योजने अंतर्गत संस्था / शाळेच्या नावे 1000 स्वेअर जागा व सातबारा उतारा किंवा दुय्यम निबंधक विभाग यांच्याकडे नोंदणीकृत 30 वर्षाच्या कराराने  असलेली जागा आहे. तसेच कमीत कमी 500 लोकसंख्या असलेल्या अनुसुचित जाती वाडी या करीता प्रस्ताव दाखला करण्यास पात्र असतील  सदर योजने अंतर्गत व्यायामशाळा बांधकामाकरीता रक्कम रु. 7.00 लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कमेच्या अनुषगाने अनुदानांपैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल. त्यानंतर व्यायामशाळा  साहित्य या करीता रुपये7.00 लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कम मी या पैकी कमी असलेले अनुदान देण्यात येईल. व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतांना शासन निर्णयानुसार 500 स्वेअर फुट हॉल, पुरुष / महिला चेजींग रुम, टॉयलेट ब्लॉक व कार्यालय इ. बाबी घेणे आवश्यक राहिल.

सदर अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ / फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती ( एस.सी) संवर्गासाठी  लाभार्थीकरीता कार्यरत  अशा सर्व शासकीय / संस्था संचलित अनुदानीत शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / वस्तीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने / समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक 16  ऑगस्ट,2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव मुळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत, असे आवाहन रविंद्र नाईक  जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                          ०००००००००

No comments:

Post a Comment