Monday, 12 August 2024

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

                 जळगाव, दि. 12 ( जिमाका ) :- राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दुर्बल व उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची निर्मिती केलेली आहे.स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पात्र लाभार्थीनी विविध योजनाचा लाभ देऊन समाजाच्या मुळ प्रवाहामध्ये समाविष्ट करण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दुर्बल व उपेक्षित घटकातील गरजू व्यक्तींनी अर्ज करावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

                        सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता या महामंडळाचे मुख्यालय, मुंबई यांच्याकडून जळगांव जिल्हाकरिता भौतिक व आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सर्व योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहेत.  सदर उद्दिष्टांच्या अनुषंगाने महामंडळाचे जिल्हा कार्यालय, जळगांव या कार्यालयामार्फत २०% बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना (रु.१.०० लक्ष पर्यंत) वयैक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु.१०.०० लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु १०.०० लक्ष ते जास्तीत जास्त २०.०० लक्ष पर्यंत) व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु.१०.०० लक्ष ते जास्तीत जास्त २०.०० लक्ष), महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास योजना अशा ७ योजना राबविण्यात येतात महामंडळांच्या सर्व योजनांचे मुख्यालयाने दिलेले उद्दिष्ट १०० % साध्य करण्याचे प्रस्तावित आहे.

                        सदर योजनेची माहिती जळगांव जिल्हयातील इतरमागास प्रवर्गातील सुशिक्षीत, होतकरु व अत्यंत गरजु व्यक्तीपर्यंत व्हावी असे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment