जळगाव दि. 21 (जिमाका) :- जामनेर तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुध्द दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु सदर वाहनाचे मालक यांनी दंडाची रक्कम अदयापर्यंत शासन जमा केली नसल्याचे या कार्यालयामार्फत सदर वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना -3 कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्याकरीता दि. 23 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11.00 वजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जप्त करण्यात आलेला वाहनाचा लिलाव करण्यात येत आहे.
वाहन मालकाचे नाव – भुषण जगन्नाथ वाघ – MH19Z3015 – डंपर- 3,22,655/-, 2,68,655/-, त.का.जामनेर,
वाहन मालकाचे नाव – राजेंद्र देवगिर गोसावी- इंजिन क्र.. JBHZ430403- डंपर-, 2,80,000/-, 2,00,000/- त.का.जामनेर,
वाहन मालकाचे नाव – विनोद उर्फ बंडू विश्वास पाटील (विष्णु लक्ष्मण काळे) – डंपर क्र. MH20 DE3204- डंपर-, 2,91,545/-, 2,91,545/- पहुर पोलीस स्टेशन,
वाहन मालकाचे नाव – ज्ञानेश्वर दिनकर बावस्कर – ट्रक क्र. MH 41 G5321- ट्रक -, 2,45,780/-, 2,45,780/- कृ.उ.बा.समिती जामनेर
वाहन मालकाचे नाव – अरुण पंढरीनाथ नन्नवरे – आयशर क्र. MH18 AA8240- आयशर -, 2, 50,000/-, 2,45,780/- कृ.उ.बा.समिती जामनेर
वाहन मालकाचे नाव – तस्लीम कदीर पटेल – MH22 AA82908- डंपर -, 7, 00,000/-, 5,65,575/- त.का.जामनेर,
सदर लिलावात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी 31 ऑगस्ट, 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय जामनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment