जळगाव दि. 5 ( जिमाका ) - जळगांव शहरातील व जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येत की, जिल्हयातील सातपुडा पर्वत रागतील व जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व त्यातील जीवनसत्व, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवून देणेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने "रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे "रानभाजी महोत्सव" दिनांक 09 ऑगस्ट, 2024 शुक्रवार रोजी सकाळी 10.00 ते 3.00 या वेळेत करण्यात आलेले आहे.
मानवी
आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा
समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच
शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे / रानफळांचे महत्व व
आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. रानभाज्यांमध्ये
विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात. तसेच सदर रानभाज्या
नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी
करण्यात येत नाही. मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या
शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जिवनस्त्वे व खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण
असतात या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टिने त्यांचे महत्व, पाककृती इ. बाबत
नागरीकांमध्य जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी या उदद्देशाने महोत्सव आयोजीत
करण्यात येत आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्रो व्यवस्था वाढून त्या विक्रीतून
शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल महोत्सवा दरम्यान संपूर्ण जिल्हयातील शेतकरी
विविध रानभाज्या उदा. करटोली,
आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कूर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग इ विविध रानभाज्या
विक्रीसाठी आणणार आहेत. तसेच शेतकरी/गटांचे मार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार
करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
सदर
महोत्सव तालुका स्तरावर दि.09 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत सप्ताह स्वरुपात
राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह
आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत
जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरदीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांना
प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी यांचेमार्फत करण्यात येत आहे.
००००००००
No comments:
Post a Comment