Friday, 2 August 2024

महसुल सप्ताह दिना निमित्त १० ऑगष्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम राबविणेबाबत

         जळगाव दि. 2 ( जिमाका ) -  जळगांव जिल्हातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/सैनिक विधवा/विरनारी/विरपिता व त्यांचे अवलंबित व सेवेत कार्यरत जवानांना कळवण्यात येते की राज्य सरकारने या वर्षी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हा महसुल सप्ताह आयोजित केला आहे. समाजातील सर्व घटकाना त्या दिवशी महसुली कामे यांचा लेखा जोखा तात्काळ जाग्यावर सादर होणार आहे.   या अनुषंगाने जळगाव जिल्हातील सर्व माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे महसूल तसेच इतर विभागातील शासकीय कामे जलद रित्या व प्राधान्याने निर्गमित करण्यासाठी सैनिक हो तुमच्या साठी कार्यक्रम दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजीत करण्यात येत आहे. आपल्या समस्या जसे की ७/१२. भूमापन घर सबंधी जमीन मोजणी, भुमी अभिलेख, MSEB ग्रामपंचायत असेसमेंट' तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडोल कामे साध्य करण्यासाठी या संधीचा फायदा जळगाव जिल्हातील सैनिक व परिवार यानी करून घ्यावा व कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मा. संजय गायकवाड सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment