जळगाव , दि. 14 ( जिमाका ) :- विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणा-या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागाकडून सुरु आहे. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.
जिल्हास्तरावरील असलेल्या महाविद्यालयामध्ये
इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्याथीं/विद्याथीनीना
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी Renew विद्यार्थ्यांसाठी
www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करु शकतात व सन
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नविन ऑनलाईन
फॉर्म भरणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थीनीनी
www.swayam.mahaonline.gov.in या वसतीगृहाच्या
ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे.
त्यानंतर सदरचा फॉर्म पंडीत दिनदयाल योजनेकडे ऑनलाईन वर्ग होईल. तसेच शासन निर्णय,
आदिवासी विकास विभाग २७ नोव्हेंबर, २०१८ अन्वये सदर योजना ही तालुकास्तरावरील सर्व
मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच
अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना सदर योजना लागू झालेली आहे. अशा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित
विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि. जळगाव
या कार्यालयाचे अधिनस्त जळगाव जिल्हयातील १५ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर
इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमासाठी व तालुकास्तरावरील सर्व मान्यता प्राप्त
तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित
महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू झालेली आहे. अशा शैक्षणिक
संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी ज्यांनी पहिल्या वर्षीं पंडीत दिनदयाल उपाध्याय
स्वयंम योजनेचा लाभ घेतलेला आहे असे नुतनीकरणासाठी www.swayam. mahaonline.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करु शकतात व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नविन ऑनलाईन फॉर्म भरणा-या अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी www.swayam.mahaonline.gov.in या
वसतीगृहाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावयाचा
आहे. त्यानंतर सदरचा फॉर्म पंडीत दिनदयाल योजनेकडे ऑनलाईन वर्ग होईल.
नविन विद्यार्थ्यांना सदर
संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी
प्राप्त युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज
भरण्यासाठी Hostel Addmission हा पर्याय निवडून काळजीपुर्वक ऑनलाईन अर्ज भरावा. जे
विद्यार्थी सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून योजनेत प्रवेशित आहे अशा सर्व
विद्यार्थीनी देखील सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात देखील जुने विद्यार्थी माणून)
नूतनीकरण अर्जा मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.
swayam योजनेसाठी अर्ज करतांना Online प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक
सर्व कागदपत्रे (उदा. मागील शैक्षणिक वर्षात मिळालेले गुणपत्रक जात
प्रमाणपत्र/जातवैधताप्रमाणपत्र (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी वडिलांचा चालू वर्षाचा
उत्पक्षाचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या
शाळा/महाविद्यालयाचे कॅप राऊन्ड सर्टिफिकेट (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी) बोनाफाईड
प्रवेश पावती/आधार कार्ड/ राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक
झेरॉक्स व इतर आवश्यक कागदपत्रे विद्याध्यांनी सोबत बाळगावेत.
८) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील
अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती
१) विद्यार्थी/विद्यार्थीनी हे अनुसूचित जमातीचे असावे.
२) विद्याध्यांकडे जात पडताळणी
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)
३) विद्याध्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५० लक्षच्या आत असणे
आवश्यक आहे.
५) विद्याध्यांचे राष्ट्रीयकृत बैंकेल खाते उघडणे बंधनकारक आहे व सदरचे खाते
हे आधार क्रमांकाशी सलंग्न असावे.
५) विद्यार्थाने प्रवेश घेतलेली शेक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे.
अशा शहरातील सदर विद्याथ्यांचे पालक रहिवासी नसावे.
६) सदर विद्यार्थी इयत्ता १२ नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा एका
विद्यार्थ्यास जास्तीत जास्त सात वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.
७) विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
८) आदिम जमातीच्या व पारधी व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर
योजनेचा लाभ प्राधान्याने देय
राहील.
९) विभागीय शहर/महानगरपालिका/जिल्हास्तरावर कार्यरत शैक्षणिक
संस्था/महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त महाविद्यालय
/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा तसेच
तालुकास्तरावर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या
शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश
घेणे आवश्यक आहे.
१०) विद्याध्यांनी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे Online
करणे बंधन कारक राहील. ११)
विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित
शैक्षणिक संस्थेच्या
वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश
मिळालेला नसावा.
१२) विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
१३) एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुस-या शाखेची पदवीसाठी प्रवेश घेतल्यास
किंवा एका शाखेची
पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण
झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार
नाही.
१४) केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात
आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेतंर्गत लाभ
देण्यात येईल. तथापी दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनचा
लाभ मिळणार नाही.
१५ ) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक २७ नोव्हेंबर, २०१८ अन्वये सदर याजनेचा लाभ
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येत आहे.
त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित
विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेकडून व्याजासह वसुलीस व कायदेशीर कार्यवाहीस पात्र
राहतील. असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी
कळविले आहे.
000000000
No comments:
Post a Comment