जळगाव , दि. 14 ( जिमाका ) :- सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार 2024 स्पर्धा आयोजीत करणेत आलेली आहे.
Wednesday, 14 August 2024
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा
याबाबत
सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.pldeshpandekalaacademy.org वर उपलब्ध आहे.
सदर अर्ज व सहभागासाठो कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या
गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दिनांक 31ऑगस्ट, 2024
पूर्वी पाठवावेत.
जिल्हा
स्तरावर जिल्हास्तरीय निवड समिती, सहभागी गणेशोत्सव मंडळांचे उत्सवस्थळी प्रत्यक्ष
भेट देवून व्हिडीओ व आवश्यक कागदपत्र प्राप्त करून घेईल तसेच प्रत्येक गणेशोत्सव
मंडळास सांस्कृतीक कार्यक्रम / स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन/ संवर्धन,
राज्यातील गडकिल्ले जतन सवर्धन, सामाजिक उपक्रम, कायमस्वरुपी राबविण्यात आलेले
सामाजिक उपक्रम पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित
वातावरण, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा, रक्तदान, वैदयकीय सेवा,
विदयार्थी महिला व वंचित घटक यांचेसाठी केलेले कार्य, सांस्कृतिक पारंपारिक
खेळाच्या स्पर्धा, गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा व आयोजनातील शिस्त इ. बाबीवर
गुणांकन करून एक उत्कृष्ठ गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे करण्यात
येईल,
स्पर्धेत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
यांना खालील प्रमाणे पारितोषीके आहेत.
प्रथम क्रमांक रक्कम
रु. 5 लाख आणि प्रमाणपत्र,
द्वितीय क्रमांक
रक्कम रु. 2 लाख 50 हजार आणि प्रमाणपत्र,
तृतीय क्रमांक रक्कम
रु. 1 लाख आणि प्रमाणपत्र
प्रत्येक
जिल्हयांतील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र.
तरी सदर स्पर्धेत जळगांव जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग
नोंदवावा, असे आवाहन जिल्हादंडधिकारी आयुष
प्रसाद यांनी केले आहे.
००००००००००००
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment