जळगाव दि. 8 ( जिमाका ) - "जिल्हयात मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश देण्यात आले.
मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले
आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त,
जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या
कार्यालयांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत
अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना /महामंडळे/उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या
प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष
प्रसाद यांनी यावेळी केले.
०००००००
No comments:
Post a Comment