जळगाव, दि. 22 - विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 ची मतमोजणी जिल्ह्यात 24 ऑक्टोबर, 2019 रोजी होणार आहे. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडणेसाठी दुरसंचार सेवा अबादितरित्या सुरु रहावी. याकरीता जळगाव जिल्ह्यात ज्याठिकाणी बीएसएनएल अंडरग्राऊड केबल तसेच OFC नेटवर्क केबल टाकण्यात आलेले आहे. त्याठिकाणचे उत्खनन, खोदकाम 24 ऑक्टोबर रोजी तुर्तास थांबविणेबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
सदरचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुध्द भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असेही डॉ. ढाकणे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
000

No comments:
Post a Comment